Accident: कारची कंटेनरला धडक; चारचाकीत असणाऱ्या पत्नीचा मृत्यू, पती - मुले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:38 IST2022-03-01T14:14:26+5:302022-03-01T15:38:39+5:30

अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला

Car hits container Wife in four wheeler killed husband children injured in pimpri | Accident: कारची कंटेनरला धडक; चारचाकीत असणाऱ्या पत्नीचा मृत्यू, पती - मुले जखमी

Accident: कारची कंटेनरला धडक; चारचाकीत असणाऱ्या पत्नीचा मृत्यू, पती - मुले जखमी

पिंपरी : अचानक थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून चारचाकी वाहन धडकले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुनावळे येथे सोमवारी (दि. २८) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. 

प्रज्ञा कैलास उपरे, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कैलास तुळशीराम उपरे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी आणि मुलांसोबत त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी एका अज्ञात कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर अचानक थांबविला. त्यामुळे फिर्यादीचे चारचाकी वाहन कंटेनरला पाठीमागून धडकले. यात फिर्यादी आणि त्यांची मुले जखमी झाली. तसेच फिर्यादीची पत्नी प्रज्ञा उपरे यांचा या अपघातात मृत्यू झाला.

Web Title: Car hits container Wife in four wheeler killed husband children injured in pimpri