Pimpri Chinchwad: पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या २ दिवसात पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 21:22 IST2022-04-13T21:22:32+5:302022-04-13T21:22:50+5:30
पत्नीने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती

Pimpri Chinchwad: पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या २ दिवसात पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : प्रेम विवाह झालेल्या तरुणीने चिंचवड येथे रविवारी (दि. १०) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या पतीनेही चिठ्ठी लिहून बुधवारी (दि. १३) गणेशनगर, डांगे चौक येथे गळफास घेतला. माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही, मला माफ करा, असे लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली.
अक्षय अंबिलवादे (वय २५, रा. गणेशनगर, डांगे चौक) आणि अश्विनी जगताप/ अंबिलवादे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक, गणेशनगर येथे वास्तव्यास असलेल्या अक्षय आणि अश्विनी यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत झाले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर ते चिंचवड येथे राहू लागले. दरम्यान, अश्विनीने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनीचा अंत्यविधी झाल्यानंतर अक्षय त्याच्या आई -वडिलांसोबत डांगे चौक येथे आला होता. अश्विनीचा विरह त्याला सहन झाला नाही. बुधवारी सकाळी अक्षयने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तरुणाने लिहिलेली चिट्ठी
माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही, माझे जे काय आहे ते माझ्या सवंगड्यांना माहीत आहे. मित्रांनो मला तुम्ही पण माफ करा, कारण मी तुमचापण गुन्हेगार आहे. काका- काकू, मला माफ करा. पप्पा, भाऊंना अलग पडू देऊनका, पोलिसांनी सहकार्य करावे, असे अक्षय याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.