पिंपरी : शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारून नदी प्रदूषण रोखण्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात एसटीपीच्या शेजारूनच ‘बायपास लाइन’द्वारे न शुद्ध केलेले सांडपाणी थेट इंद्रायणी आणि पवना नद्यांमध्ये सोडले जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले प्रकल्प केवळ कागदोपत्रीच कार्यरत असल्याची टीका होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी उभारलेले एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी यंत्रणा बंद, तर काही ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक सांडपाणी येत असल्याचे कारण पुढे करून थेट बायपासमार्गे नदीत विसर्ग केला जातो. जलवाहिनी आणि व्हॉल्व्हची रचना पाहता जाणीवपूर्वक बायपासची व्यवस्था केल्याचे दिसून येत आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन
एसटीपीचे ऑपरेशन व मेंटेनन्स सांभाळणाऱ्या ठेकेदारांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. उलट, काही अधिकाऱ्यांकडून ‘तांत्रिक अडचणी’चे कारण देत या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.
इंद्रायणीच जास्त प्रदूषित...
इंद्रायणी नदीची प्रदूषणस्थिती पवना नदीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे विविध निरीक्षणांतून समोर येत आहे. शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाणे, एसटीपी प्रकल्पांची अपुरी क्षमता आणि ‘बायपास लाइन’चा सर्रास वापर यामुळे इंद्रायणीचे पाणी काळपट, फेसाळ आणि दुर्गंधीयुक्त बनले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सांडपाणी विसर्गाचे काम, त्यांच्या करारातील अटी काय आहेत आणि नियमभंग झाल्यास कोणती कारवाई होते, याबाबतच्या नियमांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हरताळ फासण्याचे काम सुुरू आहे.
एसटीपी कोणत्या ठेकेदारांकडे आहेत आणि ते ठेकेदार पूर्णपणे जबाबदारी का टाळत आहेत. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच सर्व एसटीपी प्रकल्पांची तातडीने तांत्रिक तपासणी करावी. - नामदेवराव जाधव, संस्थापक-अध्यक्ष, सनय छत्रपती शासन पक्ष.
Web Summary : Untreated sewage bypasses Pimpri-Chinchwad's STPs, directly polluting Indrayani and Pavana rivers. Despite crores spent, plants operate nominally, with officials allegedly ignoring violations by contractors. The Indrayani is significantly more polluted due to this bypass system.
Web Summary : पिंपरी-चिंचवड के एसटीपी से अनुपचारित सीवेज बाईपास होकर सीधे इंद्रायणी और पवना नदियों को प्रदूषित कर रहा है। करोड़ों खर्च के बावजूद, संयंत्र नाममात्र रूप से काम करते हैं, अधिकारियों पर ठेकेदारों द्वारा उल्लंघन की अनदेखी करने का आरोप है। इस बाईपास प्रणाली के कारण इंद्रायणी अधिक प्रदूषित है।