पैसे परत मागणाऱ्याच्या डोक्यात फोडली दारुची बाटली; भोसरीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 17:09 IST2023-02-11T17:08:56+5:302023-02-11T17:09:50+5:30
शिवीगाळ करत हातातील काचेची दारुची बाटली डोक्यात फोडली...

पैसे परत मागणाऱ्याच्या डोक्यात फोडली दारुची बाटली; भोसरीत गुन्हा दाखल
पिंपरी : दिलेले हात उसने पैसे परत मागने एक जणाला चांगलेच महागात पडले आहे. हात उसने पैसे परत मागितले म्हणून पैसे घेणाऱ्याने पैस देणाऱ्याच्या डोक्यात दारुची काचेची बाटली फोडली. ही घटना गुरुवारी (दि.९) रात्री नऊच्या सुमारास गव्हाणे वस्ती येथे घडली. या प्रकरणी मोहनसिंग पहाडसिंग ठाकूर (वय ३४, रा. भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.१०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खेमसिंग ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहनसिंग यांनी खेमसिंग याला हात उसने पैसे दिले होते. गुरुवारी (दि.९) मोहनसिंग यांनी आपले दिलेले पैसे खेमसिंग याच्याकडे परत मागितले. पैसे मागितले असता खेमसिंग याने मोहनसिंग यांना शिवीगाळ करत हातातील काचेची दारुची बाटली मोहनसिंग यांच्या डोक्यात मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.