शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पिंपरीत जलपूजनावरून भाजप-शिवसेनेमध्ये जुंपली; खासदार श्रीरंग बारणेंची सत्ताधारी भाजपवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 21:23 IST

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर खासदार श्रीरंग बारणे यांनी टीका केली आहे.

पिंपरी  : पवना धरण शंभर टक्के भरल्यानंतर महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात येते. महापौरांच्या हस्ते बुधवारी जलपूजन केले जाणार आहे. त्यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी आज जलपूजन केले. त्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे. ‘‘पुरेसे पाणी न देता येणे हे अपयश आहे, अशी टीका बारणे यांनी केली आहे. त्याला भाजपने महापौरांचा कार्यक्रम ठरलेला असताना खासदारांनी त्यांना डावलून जलपूजन करणे म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महिला महापौरांचा अवमान केल्यासारखा आहे शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. धरण भरल्यानंतर महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात येते. त्यानुसार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी जलपूजनाचे नियोजन केले आहे. दरम्यान, आज  मावळचेशिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन केले. तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपअभियंता अशोक शेटे, सुरेश गायकवाड, सुनील हगवणे, धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रसाळ यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपवर खासदार बारणे यांनी ‘चोवीस तास पाण्यावरून महापालिकेवर टीका केली आहे.  त्यास खासदार बारणे यांच्या टीकेस भाजपाने उत्तर दिले आहे...........................ढिसाळ कारभारामुळे पाणी समस्येला सामोरे जावे लागतेखासदार बारणे म्हणाले, ‘‘चोवीस बाय सात, अमृत योजनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतु, पाणी समस्या काही संपत नाही. काही भागात जास्त, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याच्या एवढा योजना राबवूनही काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आजही शहरवासियांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. याचाच अर्थ महापालिकेचे नियोजन चुकत आहे. ........वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात असतानाही महापालिका प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारामुळेच शहरवासियांना आजदेखील दररोज, पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. काही भागात तर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दररोज पाणी देऊ शकत नसताना चोवीस तास पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो आणि करदात्यांच्या पैशांचे नुकसान केले जाते हे मोठे दुर्दैव आहे.- खासदार, श्रीरंग बारणे. 

हा तर महापौरांचा अपमान ; जलपूजन करणे ही स्टंटबाजी; भाजपचा पलटवारपिंपरी:  पवना धरण १०० टक्के भरले असल्याने दरवर्षीप्रमाणे महापौरांच्या हस्ते जलपुजनाचा कार्यक्रम होत असतो. ही आजपर्यंतची प्रथा आहे. परंतु, खासदार बारणे यांनी प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी करत जलपुजनाचा कार्यक्रम आज केला. महापौरांचा कार्यक्रम ठरलेला असताना खासदारांनी त्यांना डावलून जलपूजन करणे म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महिला महापौरांचा अवमान केल्यासारखा आहे, अशी टीका महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

खासदार बारणे यांच्या जलपूजनावर भाजपने टीका केली आहे. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘शहराचे नागरिकरण अत्यंत वेगाने वाढत असून दिवसेंदिवस पाणी साठा शहरासाठी कमी पडत चाललेला आहे. यासाठी खासदार म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून शहरासाठी काय मदत मिळावली याचे स्पष्टीकरण शहरवासीयांना द्यावे. सन २०१७ ला भाजपा सत्तेत आल्यानंतर भामा आसखेड ३०० एमएलडी पाणी उचलण्याची मंजूरी घेवून त्यापैकी आंध्रा योजनेमधून १०० एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल तयार करणे, जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकणे, जलशुध्दीकरण केंद्र अदयावत करणे व त्यापुढे पाण्याच्या टाक्या बांधून पाईप लाईन टाकण्याचे काम समांतर पध्दतीने सुरु करून नागरिकांपर्यंत जलद गतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे, याचा खासदारांना विसर पडल्याचा दिसतो.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण