वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी

By नारायण बडगुजर | Updated: March 14, 2024 19:48 IST2024-03-14T19:47:57+5:302024-03-14T19:48:33+5:30

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला

Biker dies in collision with vehicle Both injured | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी

पिंपरी : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले. देहूफाटा ते निगडी मार्गावर मंगळवारी (दि. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. 

विरण स्वामिनाथन स्वामी (३८, रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मनी मुर्गेशन आणि मानव आण्णामले, अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस अंमलदार विक्रम वाकळे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरण हे मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास देहूफाटा येथून निगडीच्या दिशेने येत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विरण यांचा मृत्यू झाला. तसेच मनी मुर्गेशन आणि मावन आण्णामले यांना गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला.  पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.

Web Title: Biker dies in collision with vehicle Both injured