पिंपरी-चिंचवडमध्ये घरांसाठी मोठी स्पर्धा..! पीएमआरडीएच्या ८३३ घरांसाठी सव्वापाच हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:20 IST2026-02-25T13:19:53+5:302026-02-25T13:20:42+5:30

- गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Big competition for houses in Pimpri-Chinchwad Five and a half thousand applications for 833 houses of PMRDA | पिंपरी-चिंचवडमध्ये घरांसाठी मोठी स्पर्धा..! पीएमआरडीएच्या ८३३ घरांसाठी सव्वापाच हजार अर्ज

पिंपरी-चिंचवडमध्ये घरांसाठी मोठी स्पर्धा..! पीएमआरडीएच्या ८३३ घरांसाठी सव्वापाच हजार अर्ज

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) गृहनिर्माण योजनेतील ८३३ सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. घरांसाठी ५,८४२ नागरिकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५,३६६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून प्रक्रियेतील आपले स्थान निश्चित केले आहे. विशेषतः पेठ क्रमांक १२ मधील सदनिकांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

पीएमआरडीएने डिसेंबर २०२५ मध्ये ही विशेष गृहनिर्माण सोडत जाहीर केली होती. यामध्ये मोशी (पेठ क्रमांक १२) आणि वाल्हेकरवाडी (सेक्टर ३०-३२) अशा मोक्याच्या ठिकाणच्या घरांचा समावेश आहे. दि. २० फेब्रुवारी या अंतिम मुदतीपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार, नागरिकांनी पेठ क्रमांक १२ मधील प्रकल्पांना सर्वाधिक पसंती दिली आहे. मोशी येथील पेठ क्रमांक १२ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (इडब्ल्यूएस-पीएमएवाय) केवळ ५५ सदनिका उपलब्ध आहेत; मात्र त्यासाठी २,२०२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. याचा अर्थ एका घरासाठी ४० अर्जदार शर्यतीत आहेत. याच भागातील अल्प उत्पन्न गटाच्या (एलआयजी) २८५ सदनिकांसाठी १,९९४ अर्ज आले असून, येथेही मोठी स्पर्धा आहे.

वाल्हेकरवाडी (पेठ क्रमांक ३०-३२) येथील प्रकल्पात सदनिकांची संख्या जास्त असून, तुलनेने स्पर्धा कमी आहे. येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (इडब्ल्यूएस) ३०६ सदनिकांसाठी ४५९, तर अल्प उत्पन्न गटाच्या (एलआयजी) १८७ सदनिकांसाठी ७११ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. या प्रकल्पामध्ये घर मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. प्राधिकरणाकडे या सोडतीद्वारे एकूण चार कोटी ४१ लाख ५४ हजार १२८ रुपये अनामत रक्कम जमा झाली आहे. ‘अर्जांच्या छाननीनंतर लवकरच पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर संगणकीय पद्धतीने पारदर्शकपणे सोडत काढली जाईल,’ असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सोडतीचा संक्षिप्त तपशील

-उपलब्ध सदनिका : ८३३

-नोंदणीकृत अर्ज : ५,८४२

-अनामत रक्कम भरलेले अर्ज : ५,३६६

-जमा अनामत रक्कम : ४,४१,५४,१२८ रुपये

Web Title : पिंपरी-चिंचवड में आवास योजना में भारी मांग; हजारों आवेदन

Web Summary : पीएमआरडीए की आवास योजना को भारी प्रतिक्रिया मिली, 833 फ्लैटों के लिए 5,000 से अधिक आवेदन प्राप्त हुए। मोशी की इकाइयों की अत्यधिक मांग है, जो किफायती आवास विकल्पों के लिए तीव्र प्रतिस्पर्धा का संकेत है।

Web Title : Pimpri-Chinchwad Housing Lottery Sees Huge Demand; Thousands Apply

Web Summary : PMRDA's housing scheme witnessed overwhelming response with over 5,000 applications for 833 flats. Moshi's units are highly sought-after, indicating intense competition for affordable housing options.