शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
6
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
7
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
8
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
9
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
10
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
11
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
12
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
13
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
14
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
15
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
16
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
17
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
18
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
19
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
20
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत ‘सोन्याचा’ कचरा

By admin | Updated: October 14, 2016 05:36 IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करून सोन्याची म्हणजे आपट्याच्या पानांची भरपूर लूट केल्यानंतर काल सोन्यासारखे महत्त्व असणाऱ्या फुलांचा

भोसरी : दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करून सोन्याची म्हणजे आपट्याच्या पानांची भरपूर लूट केल्यानंतर काल सोन्यासारखे महत्त्व असणाऱ्या फुलांचा व पानांचा आज कचरा झाल्याचे चित्र भोसरीत दिसून आले. आपट्याच्या पानांना दसऱ्याच्या दिवशी महत्त्व आहे. या दिवशी प्रतीकात्मक सोनं म्हणून ही पाने वाटली जातात. फक्त खंडेनवमी व दसऱ्याच्या दिवशी फुलांच्या विक्रीतून एकट्या भोसरीत लाखो रुपयांची उलाढाल झाली, पण दसरा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भोसरी उड्डाणपूल व मंडई परिसरात फुलांच्या कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून आले. फुलविक्रे त्यांनी आपल्या जवळ शिल्लक राहिलेला माल परत न नेता रस्त्यावरच टाकून दिल्याने शेकडो किलो फुले रस्त्यांवर पडून कचऱ्यात गेली. याच फुलांना व पानांना खतनिर्मिती विभागात योग्य पद्धतीने साठवून त्यापासून शेकडो टन पौष्टिक खत तयार करता येईल, याचा महापालिकेने विचार करणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. खंडेनवमीला सकाळपासूनच भोसरी उड्डाणपूल व बाजार परिसरात फुलविक्रे त्यांची लगबग होती. सकाळी ३० रुपये किलोच्या दराने झेंडूची फुले विक्री सुरवात झाली, तर काही ठिकाणी ५० रुपये किलो दराने संध्याकाळी उशिरापर्यंत विक्री करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी भोसरीत कित्येक टन फुलांची आवक झाली. ७० रुपये ते ९० रुपये किलो दराने शेकडो टन फुले व आपट्याची पाने भोसरीकरांनी खरेदी केली. परंतु, संध्याकाळी बाजार संपण्याच्या वेळेत पुन्हा फुलांचा भाव गडगडला व ९० रुपयांवरून १५ ते २० रुपये किलोच्या दराने विक्री सुरू झाली होती. पण, शेवटी रात्री उशिरापर्यंत चाललेली विक्री झाल्यानंतर फुलविक्रेत्यांकडे उरलेला माल परत नेण्यासाठी गाडीचे भाडे द्यावे लागेल व भुर्दंड सहन करावा लागेल. यामुळे कित्येक विक्रे त्यांनी फुले आहे त्याच जागेवर फेकून दिला. (वार्ताहर)