भाचीसाठी चायनीज आणायला गेलेल्या मामाला मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:06 IST2021-04-13T15:05:24+5:302021-04-13T15:06:46+5:30
भोसरीतील बालाजी नगरमधील घटना...

भाचीसाठी चायनीज आणायला गेलेल्या मामाला मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : भाचीसाठी चायनीज आणण्याकरिता गेलेल्या मामाला विनाकारण मारहाण केली. यात मामा जखमी झाला. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बालाजी नगर, भोसरी येथे सोमवारी (दि. १२) रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली.
सोनाली गणेश भोसले (वय २५, रा. बालाजी नगर, एमआयडीसी, भोसरी) नाही यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे. मुन्ना कानडे, अक्षय इंदले, काळ्या चंदनशिवे, निखिल कानडे, प्रथम लोंदके, प्रेम काळे, रोहन खंडागळे, रोहन गायकवाड, अवि गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. बालाजी नगर, भोसरी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांच्या लहान मुलीसाठी चायनीज आणण्याकरिता फिर्यादीचा भाऊ कृष्णा गणेश भोसले यांना पाठविले. त्यावेळी आरोपींनी काहीएक कारण नसताना फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. तसेच डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.