Pune | पत्नीसोबत राहात नसल्याने तरुणाला रॉडने मारहाण; चऱ्होली बुद्रुकमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:10 PM2022-12-29T15:10:14+5:302022-12-29T15:12:01+5:30

पत्नीसह चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

Beating a young man for not living with his wife; Incident in Charholi Budruk | Pune | पत्नीसोबत राहात नसल्याने तरुणाला रॉडने मारहाण; चऱ्होली बुद्रुकमधील घटना

Pune | पत्नीसोबत राहात नसल्याने तरुणाला रॉडने मारहाण; चऱ्होली बुद्रुकमधील घटना

googlenewsNext

पिंपरी : पत्नीसोबत राहत नाही याचा राग मनात धरून चार महिलांनी तरुणाला मारहाण केली. त्याच्या पत्नीनेही त्याला राॅडने मारहाण केली. यात तो जखमी झाला. चऱ्होली बुद्रुक येथे मंगळवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने बुधवारी (दि. २८) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्या पत्नीसह चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा व्यवसाय करतो. तो त्याच्या पत्नीसोबत राहात नाही याचा राग मनात धरून त्याच्या पत्नीने इतर तीन महिलांसोबत मिळून फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. आरोपी महिलांनी फिर्यादी तरुणाला ओढत बाहेर नेले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या पत्नीने राॅडने पायावर मारून फिर्यादीला जखमी केले. तसेच इतर महिलांनी दगड व विटांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Beating a young man for not living with his wife; Incident in Charholi Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.