शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण; देहूरोड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:35 IST2025-06-15T13:34:06+5:302025-06-15T13:35:36+5:30

शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली.

Beaten up for saying no to abuse; incident in Dehu Road | शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण; देहूरोड येथील घटना

शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण; देहूरोड येथील घटना

पिंपरी : शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. देहूरोड येथील गांधी नगरमधील नवीन पाण्याच्या टाकीमागे गुरुवारी (१३ जून) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

अनिल चंद्रकांत काळखैर (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चंदू गोरख सकट (वय ३८), करण अरुण सकट (वय २३, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल घरी जात होते. त्यावेळी संशयित हे दारू पित होते. संशयितांनी शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, असे फिर्यादी म्हणाले. त्याचा राग मनात धरून चौघांनी फिर्यादीच्या घरात घुसून लोखंडी कोयता, रॉड आणि बॅटने जबर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Beaten up for saying no to abuse; incident in Dehu Road