शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सोई-सुविधांपासून रहिवासी वंचितच

By admin | Updated: June 13, 2016 02:07 IST

राजीव गांधीनगर झोपडपट्टी व वैदू वस्तीतील रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

पिंपळे गुरव : टीचभर पोटाच्या खळग्यासाठी, पोरा-बाळांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करूनही कुटुंबासाठी अठरा विश्वे दरिद्रीच असल्याची परिस्थिती वैदू वस्ती, प्रभाग क्र-५६ मधील प्रभागाची आहे. आजही राजीव गांधीनगर झोपडपट्टी व वैदू वस्तीतील रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. यामध्ये क्रीडांगण, उद्यान, स्मशानभूमी आदी विकासकामे रखडलेली आहेत. या प्रभागामध्ये वैदूवस्ती, गजानननगर, राजीव गांधीनगर झोपडपट्टी, नेताजीनगर, रामनगर, सूर्यनगरी, सद्गुरुनगर, आनंदनगर, भैरवनाथनगर, सुदर्शननगर, जवळकरनगर, प्रभातनगर, भगतसिंग चौक, गुलमोहोर कॉलनी, काशीद पार्क आदी भागांमध्ये मजूरवर्ग, नोकरवर्ग व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या प्रभागाची लोकसंख्या ३० हजार आहे. या वस्तीत ४० टक्के वैदू समाज आहे. त्यामुळे सुसज्ज रस्ते, उद्यान, पाणीटंचाई, भाजी मंडई, डीपी रस्त्याचे रुंदीकरण, क्रीडांगणे, स्मशानभूमी आदी सुविधा नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे जिकिरीचे बनले आहे. सकाळी आठला मिळेल, त्या कामासाठी पायपीट करणे हा नित्याचाच खेळ बनला आहे. या परिसरात मजूरवर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये हातगाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या वैदूवस्तीमध्ये कचराकुंडीची सोय नसल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. पालिकेच्या दोन एकर जागेमध्ये उद्यानाचे दोन वर्षांपूर्वी उद्घाटन होऊनही आजतागायत उद्यानाचे काम सुरू झालेले नाही. या उद्यानाच्या जागेत घर दुरुस्तीचा राडारोडा, नाल्यातील कचरा आदींचे ढीग टाकलेले आहेत. क्रीडांगणाच्या जागेमध्ये खासगी वाहने उभी केलेली असतात. (वार्ताहर)मशिदीसमोरील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावले. ड्रेनेज लाइन, नेताजीनगर, गांगर्डेनगर, गजानननगर आदी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, वैदूवस्तीतील नागरिकांना शौचालयासाठी अनुदान मिळवून दिले. परिसरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. आरक्षण क्र. ३५६, वैदू वस्ती शाळेची दुरुस्ती व संरक्षण भिंतीचे काम केले. बीआरटीसाठी जागाबाधितांना घरकुल यादीत समावेशासाठी पाठपुरावा केला. हॉकर्स झोनमधील भाजीविके्रत्यांना परवाना मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. क्रीडा सभापती असताना शहरातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. - रामदास बोकड, माजी क्रीडा सभापती