Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:32 IST2023-01-10T17:32:06+5:302023-01-10T17:32:31+5:30

रिक्षाचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

auto Rickshaw driver hits passenger with stone; Incident in Pune | Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना

Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना

पिंपरी : रिक्षाचे भाड्या देण्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली. ही घटना २४ डिसेंबर २०२२ ला कासारवाडी गावच्या हद्दीत आईमाता मंदिरा जवळ घडली. या प्रकरणी मिंटू विश्वनाथ यादव (वय २३, रा.भोसरी) याने सोमवारी (दि.९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ॲटोरिक्षा (एम एच १४, जी.सी. ५४४४) हिने पुणे स्टेशनला जात होते. रिक्षाचालक आणि फिर्यादी यांच्यामध्ये भाड्याचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात चिडून जावून रिक्षाचालक याने फिर्यादी याला दगडाने मारहाण केली. असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: auto Rickshaw driver hits passenger with stone; Incident in Pune