देहूरोडमध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक 

By प्रकाश गायकर | Updated: February 21, 2025 17:52 IST2025-02-21T17:51:49+5:302025-02-21T17:52:50+5:30

इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले

Attempted shooting in Dehu Road; Four people including the culprit arrested in Sarai | देहूरोडमध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक 

देहूरोडमध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक 

पिंपरी : देहूरोड येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात येऊन भांडण करणाऱ्यांना समजावत असताना गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. याच घटनेत दोन गोळ्या लागल्याने एकाचा मृत्यू झाला होता.

ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता आंबेडकरनगर, देहूरोड येथे घडली. मलिक कुमार इंद्रा (वय १८, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साबीर समीर शेख (२४), फैजल खान (२४), जॉनी ऊर्फ साइतेजा चित्तामल्ला (२४), अभिषेक रेड्डी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह साकिब जिलानी, दिनेश कानेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते घराबाहेर गप्पा मारत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी नंदकिशोर यादव यांच्याशी वाद घातला. त्यामुळे ते भांडण सोडविण्यासाठी इंद्रा आणि त्याचा मित्र रेड्डी गेले.

त्यावेळी आरोपी साबीर याने गोळीबार करत रेड्डी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इंद्रा आणि रेड्डी हे दुचाकीवरून पळून गेले. इंद्रा हे या घटनेत घाबरल्यामुळे ते गुरुवारी पोलिस ठाण्यात आले आणि गुन्हा दाखल केला. याच घटनेत साबीर याने एका व्यक्तीवर गोळीबार करून ठार मारले. त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल आहे.

Web Title: Attempted shooting in Dehu Road; Four people including the culprit arrested in Sarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.