एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:39 IST2025-06-22T19:37:59+5:302025-06-22T19:39:26+5:30

विशेषत: वारकऱ्यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद घेतल्यामुळे विक्रमी प्रवाशांची नोंद झाली आहे.

Ashadhi Ekadashi Three lakh 19 thousand citizens traveled by metro in one day | एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास

एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास

पुणे : वारीच्या काळात येणाऱ्या वारकरी व प्रवासी यांनी अडचणी येऊ नये, यासाठी मेट्रोच्या मार्ग एक आणि दोन या लाइनवर अतिरिक्त १३० फेऱ्या चालविण्यात आल्या. याचा फायदा मेट्रो आणि वारकऱ्यांना झाला आहे. (दि.२०) रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरांतून तब्बल तीन लाख १९ हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. विशेषत: वारकऱ्यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद घेतल्यामुळे विक्रमी प्रवाशांची नोंद झाली आहे.

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. शहरातील विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पुणे मेट्रोला नागरिकांची वाढती पसंती मिळत आहे.

इतर वेळी पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजारांपर्यंत आहे; परंतु वारीमुळे एका दिवसात तीन लाखांपेक्षा नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. यामुळे मेट्रोच्या उत्पन्नात भर पडली असून, वारकरी आणि प्रवासी यांना गर्दीच्या वेळा ये-जा करण्यासाठी सोयीचे झाले आहे.

Web Title: Ashadhi Ekadashi Three lakh 19 thousand citizens traveled by metro in one day