शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

शहरात माणसे राहतात की जनावरे : महापौर राहुल जाधव संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 4:33 PM

तुम्हांला हवी ती मदत देण्यास तयार आहोत.परंतु, येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली. 

ठळक मुद्देशहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसायेत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन जबाबदारी झटकणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. कचरा प्रश्न सातत्याने डोकेदुखी ठरत आहे. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. शहरात माणसे राहतात की जनावरे असा संतप्त सवाल महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांना केला. तुम्हांला हवी ती मदत देण्यास तयार आहोत.परंतु, येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली. महापौरांनीआरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा, असा इशाराही दिला.    महापालिकेतील शहरातील विविध प्रश्नांवर आधारित आढावा बैठक झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, वाहन कार्यशाळा विभागाचे प्रमुख आणि सह शहरअभियंता प्रवीण तुपे, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, आण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, आशा राऊत,आणि अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. महापौर म्हणाले, शहर स्वच्छ राहिले पाहिजे.परंतु, शहर स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जबाबदारी झटकणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर कचरा संकलन करणा-या गाड्याची तातडीने दुरुस्ती करावी, सुट्टीच्या दिवशीही कार्यशाळा चालू ठेवावी, अशा सूचना महापौरांनी  दिल्या. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, गाड्यांची कमतरता आहे. कार्यशाळेतून गाड्या लवकर दुरुस्त करुन दिल्या जात नाहीत. शनिवार, रविवार दोन दिवस कार्यशाळा बंद असते. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यानंतर महापौरांनी कार्यशाळा विभागाच्या प्रमुखांना बोलावून घेतले. नवीन गाड्यांची खरेदी होईपर्यंत सर्वप्रथम आरोग्य विभागाचीच वाहने दुरूस्त करावीत. तसेच येत्या आठवडा भरानंतर परिस्थितीत सुधारणा केली नाही तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महापौर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरHealthआरोग्यEmployeeकर्मचारी