पिंपरी : गाडीवर पावती टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी मरकळ चौक, आळंदी येथे घडली. विजय नामदेव जरे (३३, रा. गोपाळपुरा, चाकण चौक, आळंदी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनी शुक्रवारी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर हे मरकळ चौक, आळंदी याठिकाणी वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी यापूर्वी त्याच्या गाडीवर पावती टाकल्याचा राग मनामध्ये धरून, तुला माहीत नाही का, मी स्थानिक आहे. गाडीवर तू पावती का करतो, तुला इथे राहायचे नाही का, अशी धमकी दिली. त्यानंतर जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी घातलेल्या शर्टाची गचांडी पकडून शर्टाची बटने तोडली.
गाडीवर पावती टाकल्याचा राग; वाहतूक पोलिसास रस्त्यात मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:44 IST