पिंपरी : मुंबई येथे कालच दादा आणि माझी अनपेक्षित भेट झाली होती. पण ती भेट शेवटची ठरेल असे वाटले नव्हते. दादांनी काल दिलेला कानमंत्र नेहमी लक्षात राहील, असे सांगत होते, आमदार अमित गोरखे.
विधान परिषद आमदार अमित गोरखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथे निवासस्थानी कालच रात्री भेट झाली. ते मुख्यमंत्री साहेबांच्या केबिनमध्ये होते. साहेबाना यायला उशीर होता. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्हीतून मला पहिले आणि आत बोलावले, असे गोरखे यांनी सांगितले. गोरखे म्हणाले, ' आत गेल्यावर पंधरा मिनिटे चर्चा झाली. दादानी काही गोष्टी सांगितल्या. राजकारण आज आहे उद्या नाही , तुला नशिबान देवेंद्रजी सारखा चांगला नेता मिळाला आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहा. वेळेच नियोजन करा, तब्येत सांभाळा, कार्यकर्ते तर येतच राहतील पण परिवाराला वेळ द्या. आणि बरेच काही शहराच्या राजकारणावरही दादा बरेच काही मला बोलून गेले. आजची बातमी धक्कादायक आहे. बोले तसा चाले असे व्यक्तिमत्व असलेला नेता. विकासाचा "दादा" माणूस हरपला. स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. अर्थमंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी राबवलेल्या योजनांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ते खऱ्या अर्थाने विकासाचे दादा होते.'
Web Summary : MLA Amit Gorkhe recalls his final, unexpected meeting with Ajit Pawar. Pawar advised him on politics, loyalty to Devendra Fadnavis, time management, health, and family. Gorkhe mourns Pawar's loss, highlighting his development-oriented leadership and contributions to Maharashtra's progress.
Web Summary : विधायक अमित गोरखे ने अजित पवार के साथ अपनी अंतिम, अप्रत्याशित मुलाकात को याद किया। पवार ने उन्हें राजनीति, देवेंद्र फडणवीस के प्रति वफादारी, समय प्रबंधन, स्वास्थ्य और परिवार पर सलाह दी। गोरखे ने पवार के निधन पर शोक व्यक्त किया, उनके विकासोन्मुखी नेतृत्व और महाराष्ट्र की प्रगति में योगदान को उजागर किया।