पिंपरी : शहराचा विकास होत होता, त्यावेळी शरद पवार आणि अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीने शहराची उभारणी होत होती. त्यानंतरच्या कालखंडामध्ये पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अजित दादा पवार यांनी शहरांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. शहराच्या विकासामध्ये ते भूमिका मांडत आग्रही राहत, असे सांगत होते, पिंपरी चिंचवड चे पहिले महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे. ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका ही वाटचाल दादांनी अत्यंत जवळून बघितली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये दादांनी निवडणूक लढवली आणि शहराचे नेतृत्व केले. सभा गाजविल्या. तरुणाचे संघटन केले. पुढे त्यांना आमदार आणि मंत्री म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळी शहराला राज्य शासनाच्या वतीने निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास त्यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसायचं. त्यांच्या कामाची हातोटी ही वेगळीच होती.
जागीच त्या कामाचा तुकडा पाडत असे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रियता अधिक होती. ध्येयवादी आणि दमदार असं नेतृत्व होतं. खरे तर कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता हरपला. त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आमदार, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतानाही पिंपरी चिंचवड शहरासाठी विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शहराची ओळख आता देशभर झाली आहे. त्यांच्या जाण्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Summary : Ajit Pawar played a key role in Pimpri Chinchwad's growth, focusing on development and securing funds. Known for his efficient work ethic and dedication, he significantly contributed to the city's progress, leaving a void with his passing.
Web Summary : अजित पवार ने पिंपरी चिंचवड के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई, विकास पर ध्यान केंद्रित किया और धन सुरक्षित किया। अपनी कुशल कार्यशैली और समर्पण के लिए जाने जाने वाले, उन्होंने शहर की प्रगति में महत्वपूर्ण योगदान दिया, उनके निधन से एक खालीपन आ गया।