शहरातील १० आरओ प्लांटवर कारवाई; ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 9, 2025 15:35 IST2025-02-09T15:32:51+5:302025-02-09T15:35:12+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खासगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे.

Action taken against 10 RO plants in the city; Municipal Corporation on alert to prevent the spread of 'GBS' | शहरातील १० आरओ प्लांटवर कारवाई; ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क

शहरातील १० आरओ प्लांटवर कारवाई; ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी :
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आढळलेल्या १० आरओ प्लांटवर शनिवारी (दि. ८) महापालिकेने कारवाई केली. संबंधित चालकांना प्लांट तत्काळ बंद करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

‘जीबीएस’चा प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खासगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खासगी आरओ वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करून पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय तपासणी

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय या प्लांट्सची तपासणी केली जात आहे. यामध्ये ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय २, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय २ आरओ प्लांट, तर ७ एटीएम आरओ प्लांट, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय १, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय ४ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय १ अशा आरओ प्लांटचा समावेश आहे.

आरओ प्रकल्प (प्लांट) बंद करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. पाणी हे आरोग्याचा मूलभूत घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला जाईल.   - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका 

Web Title: Action taken against 10 RO plants in the city; Municipal Corporation on alert to prevent the spread of 'GBS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.