accused injure one by scissor | पाठीत कैची खूपसून केले वार
पाठीत कैची खूपसून केले वार

पिंपरी : पाठीत कैची खूपसून वार करून जखमी केले. तसेच डोक्यात वजनकाटा मारला. यात एक जण जखमी झाला. तसेच काम्प्यूटचा किबोर्ड तोडून नुकसान केले. भोसरी येथे गुरुवारी (दि. १७) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ओगडराम नेनाराम चौधरी (वय २८, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण राठोड व त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चौधरी मेडिकल दुकानात असताना आरोपी तेथे आले. ‘‘तू काणाचे दुकान चालवितो,’’ असे म्हणून चिडून मेडिकलमधील कैची पाठीत खूपसून वार करून जखमी केले. तसेच डोक्यात वजन काटा मारून व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी चौधरी जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: accused injure one by scissor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.