शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावात ट्रक अपघातात तरुणी ठार

By admin | Updated: August 7, 2015 00:39 IST

तळेगाव-चाकण राज्यमार्गावर तळेगाव स्टेशन येथील हरणेश्वर हॉस्पिटल कमानीजवळ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रकच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात तरुणी जागीच ठार झाली.

तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण राज्यमार्गावर तळेगाव स्टेशन येथील हरणेश्वर हॉस्पिटल कमानीजवळ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रकच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात तरुणी जागीच ठार झाली.नेहा भूपेंद्र ओसवाल (वय २८, रा. जैन मंदिरासमोर, राजगुरुनगर, ता. खेड) असे या तरुणीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा वडगाव मावळ येथे माहेरी आली होती. ती अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून (एमएच १४ डीई २१७१) तळेगाव स्टेशनच्या दिशेने जात असता, त्याच दिशेने जाणाऱ्या श्री अहिरेश्वर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकच्या (एमएच १२ एफझेड ४३८८) मागील चाकाखाली सापडल्याने त्या जागीच ठार झाल्या. ट्रकचालक सुनील धोंडिबा माने (वय ४७, रा. जोशीवाडी, शिरूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस नाईक अजय पाटसकर करत आहेत. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.तळेगाव-चाकण राज्यमार्गावर वडगाव ते तळेगाव दरम्यान मागील दोन महिन्यांत झालेल्या अपघातात दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. इतर तीन अपघातांमध्ये नशीब बलवत्तर असल्याने काहींचे प्राण वाचले आहेत. राज्यमार्ग कृती समिती, मावळ मित्र नागरी आंदोलन, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी संघटना आणि विविध पक्षांच्या वतीने या मार्गावरील धोकादायक वाहतुकीसंदर्भात वारंवार आंदोलने करण्यात आली. नगरपालिका, पोलीस आणि महसूल खात्याची संयुक्त बैठकही नगरपालिका सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवकांनी आवाज उठविला होता. (वार्ताहर)