जोरात लाथ मारल्याने तरुणाचे डोके पोलवर आदळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 18:56 IST2022-10-10T18:56:13+5:302022-10-10T18:56:26+5:30
दोघांच्या वादात एकाने दुसऱ्याला जोरात लाथ मारली

जोरात लाथ मारल्याने तरुणाचे डोके पोलवर आदळून मृत्यू
पिंपरी : पोलजवळ बसलेल्या तरुणाच्या डोक्यात एकाने लाथ घातली. त्यामुळे डोके पोलवर आदळून तरुण गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ९) रात्री साडेआठच्या सुमारास आकुर्डी येथे घडली.
मोहन बन्सराज प्रसाद/गौतम (वय ३५, रा. आकुर्डी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश पिराजी खाडे (वय ३२, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मोहन हे आकुर्डी येथे एका इलेक्ट्रिक पोलजवळ बसले होते. त्यावेळी मोहन आणि महेश खाडे यांच्यात वाद झाला. महेश याने मोहन यांच्या डोक्यात जोरात लाथ मारली. त्यामुळे मोहन यांचे डोके इलेक्ट्रिक पोलला धडकले आणि ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.