नातलग महिलेशी बोलत असल्याने मजुराचा गळा आवळून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 09:47 IST2024-01-23T09:46:43+5:302024-01-23T09:47:49+5:30
दोन्ही मजूर कोहिनूर सफायर फेज या बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करत होते

नातलग महिलेशी बोलत असल्याने मजुराचा गळा आवळून खून
पिंपरी : नातेवाईक महिलेशी सतत बोलत असल्याच्या रागातून एका मजुराने बांधकाम साईटवरील मजुराचा गळा आवळून खून केला. ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज दोन येथे शनिवारी (दि. २०) रात्री आठ ते रविवारी (दि. २१) सकाळी आठ या कालावधीत ही घटना घडली.
प्रमोद रामचंद्र यादव (२३, रा. कोहिनूर सफायर फेज दोन, ताथवडे) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. अनू यादव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मृत प्रमोद यांचा भाऊ वीरेंद्रकुमार रामचंद्र यादव (१९, रा. उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद आणि अनू हे ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज या बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करतात. प्रमोद हा अनू याच्या नातेवाईक महिलेशी सतत बोलत असे. याचा अनू याला राग होता. त्या रागातून अनू याने रात्री बांधकाम साईटवर प्रमोद यांचा गळा आवळून खून केला. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश नलावडे तपास करीत आहेत.