धक्कादायक! छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून मुलीच्या डोक्यात घातला हातोडा; तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:57 IST2022-01-28T18:56:57+5:302022-01-28T18:57:12+5:30

पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.

A hammer struck the girl in the head in anger over a complaint of molestation; The youth was arrested | धक्कादायक! छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून मुलीच्या डोक्यात घातला हातोडा; तरुणाला अटक

धक्कादायक! छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून मुलीच्या डोक्यात घातला हातोडा; तरुणाला अटक

पिंपरी : पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या कालावधीत बाजार गल्ली रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी जखमी १७ वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम विनोद शेळके (वय २०, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी १७ वर्षीय मुलीने आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात छेडछाडीची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या रागातून शेळके याने हातोड्याने फिर्यादीच्या डोक्यात अनेक घाव घालून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादी मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Web Title: A hammer struck the girl in the head in anger over a complaint of molestation; The youth was arrested