शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पीएफ खात्याद्वारे ६ लाख ५५ हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 02:02 IST

बनावट पीपीएफ खाते तयार करून, त्यावर कंपनीचे पैसे भरून ते स्वत:च्या फ ायद्यासाठी वापरून ६ लाख ५५ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार

पिंपरी : बनावट पीपीएफ खाते तयार करून, त्यावर कंपनीचे पैसे भरून ते स्वत:च्या फ ायद्यासाठी वापरून ६ लाख ५५ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुकेश कुमारसिंग उर्फ शर्मा आणि संजयसिंग (दोघेही रा़ गया, बिहार) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मार्च २०१३ ते १४ जून २०१६ दरम्यान मुळचंद मार्के ट पहिला मजला, गोकुळ हॉटेल शेजारी पिंपरी येथे घडली़ या प्रकरणी इसाक सत्तार सय्यद (वय ४६, रा़ शेवाळे सेंटर, पिंपरी) यांनी तक्रार दाखल केली आहे़ फिर्यादी सय्यद यांची सक्सेस एंटरप्रायजेस सिक्युरिटी एजन्सी आहे़ आरोपी मुकेश आणि संजयसिंग हे कंपनीत नोकरीस होते़ त्यांनी बनावट पीपीएफ खाते तयार के ले़ त्या खात्यावर कंपनीचे पैसे भरून परस्पर स्वत:च्या फ ायद्यासाठी ६ लाख ५५ हजार रुपये काढले़ ही रक्कम काढून आरोपींनी अपहार केला़ ही माहिती समजल्यानंतर सय्यद यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली़ अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत़विवाहितेस विषारी पावडरचे पाणी पाजून मारण्याचा प्रयत्नपत्नीस दोन वेळेस विषारी पावडर पाण्यात मिसळून पाजून आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून जिन्याच्या पॅसेजमधून खाली ढकलून देऊन जिवे मारण्याची घटना घडली़ या प्रकरणी आरोपी चंद्रकांत भीमराव कांबळे (पती), भीमराव एकनाथ कांबळे (सासरा, रा़ देहूगाव), भागीरथी कांबळे, रवींद्र कांबळे, बाळासाहेब कांबळे यांच्या विरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ याविषयी सुनीता कांबळे (वय ३६, रा़ मोरेवस्ती, चिखली) यांनी फि र्याद दाखल केली आहे़ ही घटना डिसेंबर २००८ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान देहूगाव रुपीनगर यशदा एम्बीयन्स म्हेत्रेवस्ती चिखली येथे घडली़ संगीता आणि चंद्रकांत यांचे २००६ साली लग्न झाले आहे़ सासरी नांदत असताना डिसेंबर २००८ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान पती चंद्रकांत, सासू भागीरथी, सासरा भीमराव, आणि दीर यांनी आपापसांत संगनमत करून संगीतास त्रास दिला़ तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला़ तिच्या पतीने जानेवारी २०१६ मध्ये जबरदस्तीने विषारी पावडर पाण्यात मिसळून पाजली़ तसेच एप्रिल २०१६ मध्येही विषारी पावडर पाण्यात मिसळून संगीतास पाजून राहत असलेल्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून जिन्याच्या पॅसेजमधून खाली ढकलून दिले़ निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी चंद्रकांत याला अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)