शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी ५८ लाख

By admin | Updated: June 19, 2016 04:39 IST

तब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना

- किरण माळी,  चिंचवडतब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना कार्यक्रम, तसेच सादरीकरणाला मुकावे लागणार आहे. प्रस्तावित ५८ लाख रुपये खर्चून देखभाल व दुरुस्तीमध्ये सर्वच प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.या प्रेक्षागृहाचे उद्घाटन १९९४मध्ये झाले. शहरातील सर्वांत जास्त म्हणजे बाराशे आसनक्षमता असणारे हे प्रेक्षागृह आहे. दिवसाला १६ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम पाहतात. प्रेक्षागृहाच्या दोन्ही बाजूस पिण्याच्या पाण्याचे दोन कुलर आहेत. पहिल्या टप्प्यातील कामात प्रेक्षागृहात संपूर्ण बैठक व्यवस्था बदलण्यात येणार आहे. सन्मानिका रांगेतील खुर्च्या पूर्णपणे बदलण्यात येणार आहेत. त्यामागील रांगेतील खुर्च्यांचे कापड, तसेच कुशन बदलले जाणार आहे. यापैकी ३५० खुर्च्यांची दुरुस्ती होणार आहे, तर ७०० खुर्च्यांचे कापड बदलले जाणार आहे.सभागृहातील मॅट बदलून कार्पेट व पीव्हीसी मॅट बसविण्यात येणार आहेत. स्टेज पॉलिशिंगही केले जाणार आहे. विंगेतील पडदे, तसेच प्रोजेक्टरचा पडदाही नवीन बसविला जाणार आहे. अ‍ॅकॉस्टिक मटेरियलचे नूतनीकरण केले आहे. मागील बाजूस असलेले तिकीटघर पुढील बाजूस सुरू करण्यात येणार असून, जुन्या तिकीटघराच्या जागेत नाट्य परिषदेचे कार्यालय होणार आहे.कलावंतांसाठी आवश्यक असणाऱ्या ग्रीन रूमचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रसाधनगृहाला रंग देण्याचे कामही होणार आहे. स्वच्छतागृहातील कामे, तसेच मूलभूत सुविधाही उलब्ध होणार आहेत.दोन टप्प्यांत प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम होणार आहे. त्यांपैकी आतील भागातील दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर आवश्यक असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे तीन कोटींची निविदा काढून बाहेरील भाग प्रशस्त करणे, कॅफेटेरिया - कलादालन उभारणे, म्युरल्स तसेच दर्शनी भागातील कामे प्रस्तावित आहेत. काही महिन्यांतच दुसऱ्या टप्प्यातील कामे घेतली जाणार आहेत.- केशव फुटाणे, उपअभियंता, स्थापत्य विभागवीस वर्षांनंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. उपलब्ध सोयींचा योग्य वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता असणे आवश्यक आहे. नाट्यगृहासारख्या संस्था लोकसहभागातून देखभाल करणे शक्य आहे. स्वच्छतागृहांचा योग्य वापर, पाण्याचा वापर, संस्था व परिसरातील स्वच्छता याबाबत नागरिकांनी दक्ष असले पाहिजे. विहित वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण व्हावे व प्रेक्षागृह पूर्ववत सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. - अविनाश जाधव, व्यवस्थापक