एकतर्फी प्रेमातून नवविवाहित २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार; तरूणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:46 IST2022-06-03T18:43:41+5:302022-06-03T18:46:35+5:30

पीडित तरुणीच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन जबरदस्ती...

26-year-old newlywed raped out of one-sided love; Youth arrested | एकतर्फी प्रेमातून नवविवाहित २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार; तरूणाला अटक

एकतर्फी प्रेमातून नवविवाहित २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार; तरूणाला अटक

पिंपरी : औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून नवविवाहित २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीने हिंजवडी पाेलिसात तक्रार दिली आहे. अविनाश पांडुरंग करगळ (वय २६, रा. चांदाेर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली.

आरोपी आणि फिर्यादी औरंगाबाद येथे एमसीएचे एकत्रित शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली हाेती. त्यानंतर एमसीएच्या तीन महिन्यांचे इंटर्नशिपकरिता महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका कंपनीत आले हाेते. यादरम्यान आरोपीने तरुणीला वाकड ब्रीजजवळ वाकड, पुणे येथे हाॅटेलमध्ये घेऊन जावून तिच्यासाेबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यासोबतच दाेघांचे एकत्रित अश्लील फाेटाे माेबाइलमध्ये काढले. त्यानंतर ते फाेटाे पीडित तरुणीच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली असता, तरुणीने त्यास विराेध केला.

त्यानंतर पुन्हा आरोपीने तिला संबंधित दाेघांचे नग्न अवस्थेतील फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देऊन डाेंगे चाैक थेरगाव येथील एका हाॅटेलवर मे २०२२ मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संभोग केला. त्यानंतर सुद्धा वेळाेवेळी तरुण हा विवाहितेला ब्लॅकमेल करत तिला शरीर संबंधाची मागणी करू लागला. तसेच तिच्या पतीला अश्लील फाेटाे पाठवून त्याने तिची बदनामी केली.

Web Title: 26-year-old newlywed raped out of one-sided love; Youth arrested