बापरे! चिंचवड स्टेशनला ऑफिसमधून तब्बल '२ लाखांचा' ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 10:41 IST2021-08-10T10:41:42+5:302021-08-10T10:41:56+5:30
झेप इंटेरियर डिझाईनिंग ऑफिसमध्ये चोरीचा हा प्रकार घडला; घरफोडीचा गुन्हा दाखल

बापरे! चिंचवड स्टेशनला ऑफिसमधून तब्बल '२ लाखांचा' ऐवज लंपास
पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी ऑफिसच्या सेफ्टी डोअर चा कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम व मोबाईल फोन, असा एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. झेप इंटेरियर डिझाईनिंग ऑफिस पाटील प्लाझा चिंचवड स्टेशन येथे शनिवारी (दि. ७) ते सोमवार (दि. ९) दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. सागर पुरुषोत्तम गुंजाळ (वय ३५, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गुंजाळ यांच्या ऑफिसच्या सेफ्टी डोअरचा कडी-कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने कट केला. त्यानंतर ऑफिसमध्ये प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आहेर तपास करीत आहेत.