बलात्कार करून महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:58 IST2022-07-02T19:08:00+5:302022-07-02T19:58:03+5:30

लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला...

16 lakh cheated from a woman by rape Shocking incident in Pune | बलात्कार करून महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना

बलात्कार करून महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना

पिंपरी : शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तिच्याकडून १६ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार १५ मार्च २०१८ ते १४ मे २०२२ या कालावधीत सुसगाव आणि तुळजापूर येथे घडला.

गिरीश भीमराव भोसले (वय ३९, रा. उस्मानाबाद. मूळ रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. १) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवली. आरोपीने तो स्वतः विवाहित आहे, हे फिर्यादीपासून लपवून ठेवले. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिलेचा विश्वास संपादन करून वेळोवेळी १६ लाख १० हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: 16 lakh cheated from a woman by rape Shocking incident in Pune