शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

लोणावळ्यात १५ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड ; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 5:01 PM

लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली.

ठळक मुद्देआरोपीचे अजुन तीन साथीदार आरोपी फरार

लोणावळा : लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १५ घरफोड्या उघडकीस आल्या असून १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वसिम रुबाबअली शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोणावळा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला २४ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची माहिती दिली. यावेळी लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने व तपास पथक उपस्थित होते.      मागील दोन वर्षात लोणावळा शहरात घरफोड्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली होती. मात्र, आरोपी हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. नुकत्याच पुणे ग्रामीणच्या अधिक्षक पदावर रुजु झालेले संदीप पाटील, अपर अधिक्षक संदीप जाधव, ज्ञानेश्वर शिवथरे व पोलीस निरीक्षक भगवान पाटील यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले असता तुंगार्ली येथील घरी येत नसलेला आरोपी वसिम शेखचा शोध तो हनुमान टेकडी परिसरात भाड्याने राहत असल्याचे समजले. त्याला संशयावरुन ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने लोणावळा परिसरात घरफोड्या केल्याच्या पंधरा घटनांची कबुली दिली. तसेच त्याने चोरलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. वसिम याचे अजुन तीन साथीदार आरोपी फरार आहेत.  सध्यस्थितीत आरोपीकडून ४५ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने, २ लॅपटॉप, १ कॅमेरा, ३ एलईडी टिव्ही, ३ मोबाईल असा १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.   पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे व गुन्हे शोध पथकाचे श्रीशैल कंटोळी, अमोल कसबेकर, समीर करे, पोलीस कॉन्स्टेबल जयराज देवकर, प्रशांत खुटेमाटे, संतोष दावलकर, शरद वारे, मनोज मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlonavalaलोणावळाPoliceपोलिसArrestअटक