शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

Video: पिंपरीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:48 PM

जिवाचा आकांत अन् गर्दीचा न थांबणारा गलका...  मातीच्या ढिगाऱ्यातून मुलीला काढण्यासाठी अडीच तास बचावकार्य

पिंपरी : जिर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग कोसळून १५ वर्षीय मुलगी ढिगाऱ्यात अडकली. तेथे हवा यावी म्हणून प्रयत्न करीत असतानाच मुलीला हिम्मत देण्याचे काम स्थानिकांनी केले. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. अडीच तास मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने केव्हा गुदमरत होते तर केव्हा आता सारे संपले, असे वाटून जिवाचा आकांत सुरू होता. ढिगाऱ्यात अडकलेल्या मुलीची मदतीची याचना अन् गर्दीचा न थांबणारा गलका... यामुळे फुगेवाडीत यंत्रणेची पळापळ सुरू होती. तब्बल अडीच तास बचावकार्य सुरू ठेवत मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

पौर्णिमा उर्फ आशु संभाजी मडके (वय १५), असे ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई आई मनीषा (वय ३५), बहीण निशी (वय ६) यांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. पौर्णिमाचे वडील संभाजी मडके (वय ४३) हे एका खासगी संस्थेत नोकरीला आहेत. फुगेवाडी येथे स्टार स्पोर्ट्स क्लब चौकात अक्षय अशोक देवकर यांच्या मालकीचे जुने घर आहे. या घराच्या पहिल्या मजल्यावर मडके कुटुंब गेल्या बारा वर्षांपासून भाडेतत्वावर राहण्यास आहेत. माती, विटा व लाकडाचा वापर करून बांधलेल्या या घराची इमारत जिर्ण झाली आहे. 

संभाजी मडके हे शनिवारी (दि. २८) सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर मनीषा मडके व निशी या दोघीही घराच्या खाली थांबल्या असताना साडेनऊच्या सुमारास पौर्णिमा पहिल्या मजल्यावर आंघोळ करीत होती. त्यावेळी पहिल्या मजल्याचा काही कोसळला. त्यामुळे पौर्णिमा ही खाली पडून ढिगाऱ्यात अडकली. या आवाजाने घराजवळील भीमराव चौधरी यांनी तेथे धाव घेत मनीषा आणि त्यांची मुलगी निशी हिला त्वरित बाहेर काढले. सुदैवाने ते ढिगाऱ्याखाली अडकले नाहीत. त्यानंतर तेथे आरडाओरडा झाला. त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पौर्णिमा ढिगाऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाले. 

पौर्णिमा घरात अडकली असल्याची माहिती स्टार स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष मयूर पुंडे यांना मिळाली. त्यांनी घरात जाऊन ढिगाऱ्याची माती, फरशी हटवून पौर्णिमाच्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू झाले. मात्र घर जुणे असल्याने घराचा काही भाग कोसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बचावकार्यात अडथळे आले. दरम्यान पौर्णिमा घाबरलेल्या अवस्थेत होती. हवा नसल्याने तेथे गुदमरत होते. मयूर पुंडे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. घराचा काही भाग पुन्हा कोसळत असल्याने आता सर्व संपले, आपणही ढिगाऱ्यात अडकणार, असे पुंडे यांना वाटले. मात्र तरीही त्यांनी धीर सोडला नाही. पौर्णिमालाही हिंमत दिली. 

दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घरात प्रवेश करून मयूर पुंडे व स्थानिकांच्या मदतीने दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पौर्णिमाला सुखरूप बाहेर काढले. या वेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून बचावकार्य करणाऱ्यांचे कौतुक केले. तसेच पौर्णिमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गल्लीबोळामुळे मदतकार्यात अडथळेफुगेवाडीतील दाट वस्तीत ही घटना घडली. गल्लीबोळातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाचा बंद किंवा इतर चारचाकी वाहन थेट घटनास्थळापर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे मदतकार्य करण्यात अडथळे येत होते. तरीही पिंपरी-चिंचवड महापालकेच्या अग्निशामक दलाचे जवान, स्थानिक नागरिक, एनडीआरएफ यासह इतरांनी शर्थीचे प्रयत्न करून बचावकार्य केले. 

संसार झाला उध्वस्तघर कोसळल्याच्या घटनेमुळे मडके कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. आता ते घर राहण्यायोग्य नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBuilding Collapseइमारत दुर्घटनाFire Brigadeअग्निशमन दल