Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:54 IST2025-11-17T18:44:50+5:302025-11-17T18:54:10+5:30

आयुष्यात एकदातरी भेट द्यायलाच हवी अशी 'ही' ६ जादुई ठिकाण...

तुम्हाला तुमच्या लहानपणी ऐकलेल्या परीकथांसारख्या वाटणाऱ्या ठिकाणी भेट द्यायची असेल, तर ही खास माहिती तुमच्यासाठीच आहे. आयुष्यात एकदातरी भेट द्यायलाच हवी अशी 'ही' ६ जादुई ठिकाण...

नेदरलँड्सचे गिएथूर्न : जर तुम्ही अत्यंत शांत आणि निसर्गरम्य जागेच्या शोधात असाल, तर नेदरलँड्समधील गिएथूर्नला नक्की भेट द्या. हे ठिकाण इतके सुंदर आहे की त्याला 'व्हेनिस ऑफ द नॉर्थ' म्हटले जाते. जे कोणी एकदा या ठिकाणी येतात, ते पुन्हा इथे भेट देण्याचा बेत नक्कीच आखतात.

फ्रान्सचा माउंट सेंट मिशेल : फ्रान्समधील माउंट सेंट मिशेल हे गाव असे वसले आहे, जणू काही ते समुद्रातून बाहेर येत आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण गावात दिव्यांच्या प्रकाशात चमचमाट होतो, तेव्हा ते दृश्य शब्दांत वर्णन करणे कठीण होते. फ्रान्सला भेट देण्याची संधी मिळाल्यास या ठिकाणी एकदा नक्की जावे.

ऑस्ट्रियाचे हॉलस्टॅट : ऑस्ट्रियामधील सेलेने सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या हॉलस्टॅट या छोट्याशा गावाची सुंदरता इतकी जबरदस्त आहे की, येथे आलेले पर्यटक परत जायचे नाव घेत नाहीत. एका बाजूला शांत सरोवर आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार पर्वत असे नैसर्गिक दृश्य मनाला कमालीचा शांत आणि सुंदर अनुभव देतात. येथील सुंदर चर्चेस देखील तुमचे लक्ष वेधून घेतात.

पोर्तुगालचा सिंट्रा : भव्य महल असोत किंवा आकर्षक गार्डन्स, सौंदर्याच्या बाबतीत पोर्तुगालचे सिंट्रा कोणापेक्षाही कमी नाही. हिरवीगार वनराई आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला येथील पेना पॅलेस इतका भव्य आहे की, येथे फिरणाऱ्या लोकांना लगेच परीकथांची आठवण येते.

फ्रान्सचे कोलमार शहर : फ्रान्स तसेही खूप सुंदर आहे, पण येथील कोलमार शहर आपल्या मनमोहक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील रंगीबेरंगी इमारती, शांत कालवे आणि खास वास्तुकला कोणाचेही मन मोहून टाकण्यासाठी पुरेशी आहे. येथे आल्यावर आपण एखाद्या परीलोकात आल्याचा अनुभव येतो.

जर्मनीचा निओश्वानस्टीन किल्ला : लहानपणी तुम्ही सिंड्रेलाची कथा नक्कीच पाहिली असेल. आता तुम्ही सिंड्रेलाच्या किल्ल्याला प्रत्यक्षात पाहू शकता! जर्मनीच्या बावारिया प्रांतामध्ये हा निओश्वानस्टीन किल्ला आहे. याचे स्वरूप अगदी सिंड्रेलाच्या किल्ल्यासारखे आहे. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.