दिल्ली-एनसीआरमध्ये वीकेंडसाठी हे रिसॉर्ट आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:45 PM2019-03-27T20:45:03+5:302019-03-27T20:53:08+5:30

बऱ्याचदा देशाची राजधानी असलेली दिल्ली फिरण्याची अनेकांची इच्छा असते. दिल्लीत गेल्यावर राहण्या-खाण्याचा प्रश्न सतावत असतो. दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक असे रिसॉर्ट आहेत जे वीकेंडसाठी बेस्ट आहेत.

दिल्ली-जयपूर महामार्ग एनएच-8वरही गुरुग्रामजवळ मेवाड जिल्ह्यात सुरजीवन रिसॉर्ट आहे. दिल्लीपासून हे फक्त 29 किलोमीटर अंतरावर आहे. पिकनिकसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. या रिसॉर्टची रंगसंगती एकदम गावासारखी आहे.

राजस्थानमधल्या हवेली फॅशनमधील रिसॉर्टही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. दिल्ली विमानतळावरून हे रिसॉर्ट फक्त 30 मिनिटांवर आहे. या रिसॉर्टमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं अनोखं मिश्रण पाहायला मिळतंय.

दिल्लीपासून 51 किलोमीटर दूरवर सोहनाजवळ दमदा लेकच्या किनाऱ्यावर बोटॅनिक्स नेचर रिसॉर्ट आहे. अरावलीच्या डोंगरांमध्ये असलेलं रिसॉर्टमध्ये राहणं थोडं खर्चिक आहे. पण इथे निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याची अनुभूती येते.

दिल्लीतल्या फरिदाबादेतील रिसॉर्ट मांगर गावाजवळ आहे. दिल्ली आणि गुरुग्रामच्या हे रिसॉर्ट मध्येच असल्यानं इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.