सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:38 PM2018-09-21T20:38:32+5:302018-09-21T20:53:06+5:30

सुट्टीमध्ये फिरण्यासाठी अनेकांकडून चांगल्या ठिकाणांचा शोध घेतला जातो. जर तुम्हालाही तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर खाली दिलेल्या शहरांची नावेही तुमच्या यादीत समाविष्ट करा.

बेलारूस - बेलारूस हा पर्यटनाच्या दृष्टीने किफायतशीर देश आहे. येथील संग्रहालये सोव्हियत युनियनच्या काळातील आठवणी जागवणारी आहेत.

कूक आयलँड - येथील नैसर्गिक सौंदर्य अद्यापही अबाधित आहे. त्यामुळे कमी खर्चात तुम्ही निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता.

कोस्टा रिका - उन्हाऴ्याच्या सुट्टीमध्ये कोस्टा रिका हा फिरण्यासाठी उत्तम देश आहे. येथे तुम्ही बोटिंग, स्नॉर्कलिंग, सर्फिंग जेट, स्कीइंग, राफ्टिंग यासाख्या खेळांचा आनंद घेऊ शकता.

दिरंग - अरुणाचल प्रदेशमधील दिरंग हे छोटेसे शहर उन्हाळ्यातील पर्यटनाच्यादृष्टीने उत्तम पर्याय आहे.

कन्याकुमारी - भारताचे दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारी येथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम पाहण्यासारखा आहे.

काश्मीर - काश्मीर हे भारतातील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे सफरचंदाच्या बागा आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.

झिम्बाब्वे - वन्यजीव प्रेमींसाठी झिम्बाव्बे हा फिरण्यासाठी सर्वोत्तम देश आहे. येथे मोठमोठ्या अॅनिमल पार्कमधून तुम्ही विविध प्राणी अगदी जवऴून पाहू शकता.