Travel tips: केवळ अद्भूत! ढगांच्या वरुन जातोय हा ब्रीज, परदेशात नव्हे आहे भारतात 'या' ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 06:59 PM2022-02-11T18:59:08+5:302022-02-11T19:17:20+5:30

अनेकांना उंचीची क्रेझ असते. उंच ठिकाणांहुन प्रवास करायला अनेकांना आवडतं. त्यासाठी ते परदेशात निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनाला जातात. पण समजा भारतातच असं ठिकाण असेल तरं. असं ठिकाण आकाराला येतंय. चक्क ढगांच्या वरुन हा ब्रीज गेलाय. विश्वास वाटत नसेल तर पाहा Photos.

ढग तुमच्या जवळ आल्यासारखे वाटतील असे बरेच उंच पूल पाहिले असतील पण हा पूल इतका उंच आहे की तो ढगांच्याही वर आहे.

ढगांच्या वरून जाणारा हा पूल पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला हे ठिकाण परदेशातील वाटेल. पण तसं नाही हा पूल आपल्या भारतातच आहे.

जगातील सर्वात उंच पूल चिनाब ब्रीज जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीवर तयार होतो आहे.

रियासी जिल्ह्यातील कटरा-बनिहाल मार्गावर हा पूल बनतो आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ब्रीजचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

ढगांच्या वर जगातील सर्वात उंच चिनाब ब्रीज, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हा ब्रीज इतका उंच आहे की ढगही त्याच्या खाली आले आहेत.

नदीच्या तळापासून या ब्रीजची उंची तब्बल 359 मीटर आहे.

या ब्रीजचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या स्ट्रक्चरल स्टीलने हा पूल बनवण्यात आला आहे.

ते माइनस 10 डिग्री सेल्सियस ते 40 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान झेलू शकतं.