भारत-श्रीलंका सीमेवरील एक असं गाव जिथे रात्रीच काय दिवसाही जाण्यास घाबरतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 01:03 PM2019-06-07T13:03:48+5:302019-06-07T13:12:15+5:30

श्रीलंकेच्या सीमेवर भारताचं शेवटचं गाव आहे धुनषकोटि. या गावाबाबत अनेक अंधश्रद्धा ऐकायला मिळतात. असं मानलं जातं की, या गावात भूतं आहेत, त्यामुळे अंधार होताच या गावात जाण्यास बंदी आहे. रामेश्वरमहून या गावात पोहोचण्याचा रस्ता १५ किमीचा आहे. हा रस्ता फार भीतीदायक आणि रहस्यमयी मानला जातो. त्यामुळे इथे कुणाला जायचं असेल तर ग्रुपनेच जातात आणि सायंकाळ होण्यापूर्वीच परत येतात. (Image Credit : www.holidify.com)

या गावात वाढत असलेल्या पर्यटनामुळे भारतीय नौसेने इथे एक चौकी सुद्घा तयार केली आहे. आणि येथील सर्वात मोठी खासियत म्हणजे इथे तुम्हाला महासागराचं दर्शन जवळून करू शकता. पण हे ठिकाण कथित भूतांमुळेच चर्चेत आलं.

१९६४ मध्ये भीषण चक्री वादळामुळे पूर्णपणे उद्घस्त झालं होतं. त्याआधी या गावात सर्वच सुविधा होत्या. पण वादळाने या ठिकाणाचं सौंदर्य पूर्णपणे नष्ट झालं. मात्र हिंदू मान्यतांनुसार, धनुषकोटि हे ठिकाण फार पवित्र मानलं जातं.

एकीकडे या ठिकाणाचा संबंध भगवान रामाशी जोडला जातो तर दुसरीकडे इथे प्रेतआत्मांचा वास असल्याचीही शंका व्यक्ती केली जाते. असं मानलं जातं की, वादळामुळे येथील लोक मारले गेले आणि त्यांच्यावर अंतिम संस्कारही करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांची आत्मा इथे भटकत असल्याचं बोललं जातं.

धनुषकोटिबाबत मान्यता आहे की, लंका जिंकल्यावर भगवान श्रीरामाने लंकेची गादी रावणाचा भाऊ विभीषण याला सोपवली होती. त्यानंतर विभीषणाने रामाला रामसेतु तोडण्याची विनंती केली होती. त्यानंतर रामाने तीर मारून एका बाजूने रामसेतू तोडला होता. तेव्हाच या गावाचं नाव धनुषकोटि पडलं.

श्रीलंकेच्या सीमेवर असलेलं हे गाव भारतातील सर्वात छोटं गाव मानलं जातं. हे गाव भारत आणि श्रीलंकेला एकमेकांशी जोडतं.

१९६४ मध्ये वादळाआधी हे ठिकाण एक लोकप्रिय पर्यटन स्थळ होतं. इथे वाहतुकीसाठी फेरीची व्यवस्था होती. तसेच पर्यटकांना फिरण्यासाठी रेल्वे लाइन आणि रेल्वे स्टेशनही होतं. हॉटेल, मार्केट आणि पोस्ट ऑफिसची सुविधा देखील इथे होती.

अशी मान्यता आहे की, काशीची तीर्थयात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा लोक महोदधि आणि रत्नाकरच्या संगमवार स्थित धनुषकोटिमध्ये स्नान करतात आणि रामेश्वरमला जाऊन पूजा करतात. (Image Credit : traveltriangle.com)

पौराणिक महत्व असल्याकारणाने लोक इथे फिरायला येतात. पण जेव्हापासून इथे भूतांची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून इथे पर्यटकांची संख्या वाढली. पण या गावात कमीच लोक राहतात. (Image Credit : traveltriangle.com)