कपल्ससाठी परफेक्ट रोमॅन्टिक डेस्टिनेशन आहे अंदमानमधील 'हा' बीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 13:54 IST2019-09-14T13:41:21+5:302019-09-14T13:54:28+5:30

अंदमान-निकोबार बेटं भारतातील कपल्ससाठी स्वर्ग म्हणून ओळखली जातात. तंस पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर येथील सर्व बीच फिरण्यासाठी उत्तम आहेत. पण येथील हॅव्हलॉक आयर्लंडवरील राधानगर बीच अतिशय सुंदर आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका मॅगझिनने या बीचला जगभरातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या यादीमध्ये आठवं स्थान दिलं आहे. जाणून घेऊया या किनाऱ्याबबातच्या खास गोष्टी... (Image Credit : Cleartrip)
हॅव्हलॉक बेटावर आहे राधानगर बीच
राधानगर बीच अंदमान-निकोबारमधील सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखला जातो. सुंदर सूर्यास्त, पांढरी वाळू आणि निळ्याशार पाण्यासाठी हा बीच अत्यंत लोकप्रिय आहे. (Image Credit : MakeMyTrip)
कपल्ससाठी रोमॅन्टिक डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध
येथे अनेक कपल्स येत असून त्यांच्यासाठी रोमॅन्टिक डेस्टिनेशन्स म्हणून हा बीच अत्यंत प्रसिद्ध आहे. आपल्या पार्टनरसोबत चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या वाळूवर बसून सेनसेट पाहण्याचा आनंद खरचं खूप वेगळा असतो.
सुंदर सनसेटचा अद्भूत नजारा
समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पायी फिरू शकता. तसेच सूर्यास्त किंवा सूर्योदयाची सुंदर दृश्य पाहू शकता. (Image Credit : TripAdvisor)
मान्सून ठरतो बेस्ट टाइम
अंदमान-निकोबार बेटांवर फिरायला जाण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानचा काळ परफेक्ट असतो. जर येथील खरं सौंदर्य पाहायचं असेल तर तुम्ही मान्सूनमध्ये येथे भेट देणं अत्यंत फायदेशीर ठरेल. (Image Credit : TripAdvisor)
आशियामधील बेस्ट बीच
राधानगर बीच आशियामधील बेस्ट बीच आहे. येथे अनेक बीच फेसिंग रिसॉर्ट आहेत. येथे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवू शकता.
वॉटर अॅक्टिव्हिटींचा घेऊ शकता आनंद
पर्यटकांसाठी राधानगर बीचवर स्नोर्कलिंग, फिशिंग गेम्स, स्विमिंग आणि स्कूबा डायविंग इत्यादी अॅक्टिविटी करू शकता.
भूरळ घालणारं निसर्गसौंदर्य
तुम्हाला सोलो ट्रिपचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या बीचला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला अद्भूत निसर्गसौंदर्य पाहता येईल. (Image Credit : tranhdantuong5d.com)
जगभरातील 8वा सर्वात सुंदर बीच
ट्रिप अॅडवायझर्सच्या 'वर्ल्ड्स ट्रॅव्हलर्स चॉइस अवॉर्ड्स'मध्ये या बीचला जगभरातील 8वा सुंदर बीच म्हणून किताब मिळाला आहे. ट्रिप अॅडवायझर अमेरिकेतील ट्रॅव्हल वेबसाइट कंपनी आहे.
बेस्ट पिकनिक स्पॉट
अंदमान-निकोबारमधील बेस्ट बीचपैकी एक आहे राधानगर. जो कपल्ससोबतच फॅमिलिसोबत जाण्यासाठीही उत्तम पिकनिक स्पॉट आहे. (Image credit : zenithholidays.com)