किती लांबीच्या आहेत जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्या? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 04:56 PM2020-03-23T16:56:25+5:302020-03-23T17:39:50+5:30

गंगा ही भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे. तुम्हाला माहीतच असेल. जगभरातील मोठ्या नद्याबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत. जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांमध्ये गंगेचा सुद्धा समावेश होतो. पूर्व आफ्रिकेतील नील नदी ही 6650 किमीपर्यंत पसरलेली आहे. ही नदी भूमध्य सागराला जाऊन मिळते.

दक्षिण अमेरिकेतील एमॅजॉन नदी ही जगातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे. 6400 किमीपर्यंत पसरलेली ही नदी आहे.

यांग्त्ज़ी नदी ही आशियातील सगळ्यात मोठी आणि जगात तीसरा क्रमांक असलेली मोठी नदी आहे. या नदीची लांबी 6300 आहे.

अमेरिकेतील मिसीसिपी नदी ही जगातील चौथी सगळ्यात मोठी नदी आहे. 6275 किमी लांबी असलेली ही नदी आहे.

रुस आणि मंगोलियामध्ये वाहणारी येनिसे नदी आर्कटीक महासागरात वाहणारी आहे. 5539 किमीपर्यंत पसरलेली ही नदी आहे.

चीनमधील येल्लो नदी ही हुआंग नावाने सुद्धा ओळखली जाते. 5664 किमीपर्यंत ही नदी वाहते.

रूसमधील ओब नदी ही पश्चिमी सैबेरिया क्षेत्रात वाहते. ही नदी 5410 किमीपर्यंत पसरलेली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील पराना नदी ही जगातील मोठ्या नद्यांपैकी आहे. 4480 किमीपर्यंत ही नदी वाहते.

आफ्रिकेतील कांगो नदी 'जेयरे नदी' नावाने सुद्धा ओळखली जाते. 4700 किमी दूरपर्यंत पसरलेली ही नदी आहे.

अमूर-अर्गुन नदी ही जगातली सगळ्यात मोठी नदी 4444 किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. या नदीचा चीनी भाषेत हेईलौंग ज़ियांग असं सुद्धा म्हटलं जातं. ही नदी रुसमध्ये आहे.