Worlds Dangerous Airports: 'ही' आहेत जगातील ५ सर्वात धोकादायक विमानतळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:35 IST2025-05-16T10:30:04+5:302025-05-16T10:35:35+5:30

most dangerous airports in world: दररोज लाखो प्रवासी जगभरातून प्रवास करतात. परंतु, काही विमानतळ असे आहेत, जिथे प्रत्येक टेकऑफ आणि लँडिंग जोखमीपेक्षा कमी नाही.

जुआंचो ई. यारौस्किन विमानतळ (साबा बेट, नेदरलँड): हे जगातील सर्वात लहान धावपट्टी असलेले विमानतळ आहे, ज्याची लांबी फक्त ४०० मीटर आहे. आजूबाजूला उंच पर्वत आहेत आणि दोन्ही टोकांना समुद्र आहे.

टोंकॉन्टीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (होंडुरास): या विमानतळाची धावपट्टी डोंगराळ भागात १००५ मीटर उंचीवर आहे आणि खूपच लहान आहे. खराब हवामानात येथे उतरणे खूप धोकादायक आहे.

मदेइरा विमानतळ (पोर्तुगाल) जोरदार वारे आणि समुद्रावर बांधलेली धावपट्टीवर विमानाची लँडिंग करणे खूप आव्हानात्मक आहे. या विमानतळावर विमान उतरण्यासाठी १८० अंश फिरवावे लागते.

पारो विमानतळ (भूतान) हिमालयीन टेकड्यांमध्ये वसलेले हे विमानतळावर विमान लँड करणे अत्यंत कठीण आहे. येथे फक्त निवडक वैमानिकांनाच विमान उतरवण्याची परवानगी आहे.

कौरचेव्हल अल्टीपोर्ट (फ्रान्स) फ्रेंच आल्प्सच्या टेकड्यांमध्ये वसलेली ही धावपट्टी फक्त ५३७ मीटर लांब आहे. तीव्र वळणे आणि धुक्यामुळे या विमानतळावर लँडिंग करणे खूप धोकादायक आहे.