Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:48 IST2025-07-23T12:42:24+5:302025-07-23T12:48:57+5:30
Wife Killed Husband in Nalasopara: शेजारी राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असलेल्या २८ वर्षाच्या महिलेने पतीलाच संपवले. हत्या लपवण्यासाठी त्याला घरातच पुरले. पण, प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याआधीच हे उघड झालं.

२८ वर्षीय महिलेने तिच्या ३२ वर्षीय पतीची हत्या केली. हत्येनंतर घरातच खड्डा खोदून त्याला पुरले आणि त्यावर स्टाईल्स बसवल्या. पण, हत्येचे हे प्रकरण समोर आलंच. तोपर्यंत महिला तिच्या २० वर्षीय प्रियकरासोबत फरार झाली होती. या घटनेची सगळी माहिती आता समोर आली आहे.
विजय चौहान असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर चमन देवी असे हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना पाच वर्षाचे मुलही आहे. पण, विजय नोकरीबरोबर ओव्हरटाईमही करायचा आणि त्याच काळात चमन देवीला विवाहबाह्य संबंध सुरू झाले.
शेजारी राहणाऱ्या मोनू प्रजापती या २० वर्षाच्या तरुणावर चमन देवीचा जीव जडला. पती घरी नसताना दोघेही भेटायचे. पण, नंतर विजय आणि चमन यांच्यात वाद सुरू झाले. एक दिवस चमनने मोनूसोबत मिळून विजयची हत्या केली आणि त्याला घरातच पुरले.
एक दिवस त्याचा फोन बंद असल्याने विजयचा भाऊ अखिलेश चौहान घरी गेला. १० जुलै रोजी तो घरी आला तेव्हा चमन देवी म्हणाली की विजय कामानिमित्त कुर्लाला गेला आहे. कामामुळे त्याला वेळ मिळत नाही. त्यानंतर अखिलेश निघून गेला.
मागच्या शनिवारी (२० जुलै) अखिलेश चमन देवीचाही मोबाईल बंद येत असल्याने पुन्हा विजयच्या घरी आला. त्यावेळी त्याने आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितले की, तुझी वहिनी मागील दोन-तीन दिवसांपासून दिसलीच नाही. त्याचबरोबर मोनू गायब असल्याचे कळले.
त्यानंतर अखिलेश घरात शिरला. त्याने घरात नजर फिरवली. तिथे कुणीही नव्हते. घरात बघत असतानाच त्याला एका कोपऱ्यात संशयास्पद प्रकार दिसला. एका कोपर्यातच नवीन स्टाईल्स लावलेल्या त्याला दिसल्या. त्यामुळे त्याचा मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना बोलावले.
शेजाऱ्यांच्या मदतीने स्टाईल्स काढल्या. त्यानंतर त्यांनी खोदले. चार फूट खोदल्यानंतर त्याला भावाचे कपडे दिसले. खोदलेल्या खड्ड्यातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. फॉरेन्सिक टीम आल्यानंतर विजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर चमन देवी आणि मोनूला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.