धरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:33 IST2018-05-25T16:31:17+5:302018-05-25T16:33:37+5:30

मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारी अनेक धरणं आहेत. (सर्व छायाचित्रं - विशाल हळदे)
शहापूर तालुक्यातील भातसा धरणातूनही अशाच प्रकारे मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो.
याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.
धरण शेजारी असूनही इथल्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणा-या टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते.
घसा कोरडा पडलेल्या विहिरींतील पाषाणात एखादा पाझर फुटेल, या आशेने खोदकाम सुरूच असते.
एखाद्या विहिरीत ओंजळभर पाणी दिसले तरी विहिरीत उतरण्याची कसरत दिसते.