गोवेली ते आळंदी पायी दिंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 22:45 IST2019-11-16T22:40:19+5:302019-11-16T22:45:34+5:30

टिटवाळा: दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या मोठ्या उत्साहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करत आळंदीकडे प्रस्थान झाल्या आहेत. याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळाची गोवेली ते आळंदी पायी दिंडी आळंदीकडे रवाना झाली आहे. या दिंडी सोहळ्यात शेकडो लहान थोर वारकरी सहभागी झाले आहेत.