शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:38 IST2017-12-15T16:32:57+5:302017-12-15T16:38:07+5:30

भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
आंदोलनात सेनेचे नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
आंदोलनाची सुरुवात पालिका मुख्यालयातील शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
काही मल्लांनी मारुतीच्या मुखवट्यात आंदोलनाला सबळ आशीर्वाद दिल्यानंतर मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू करण्यात आले.
जोपर्यंत ठोस कार्यवाही केली जाणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे विरकर यांनी सांगितले.