शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1 सेकंदात तुमचा iPhone हॅक होणार; पर्सनल डेटा चोरीला जाणार, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 3:14 PM

1 / 6
iPhone Hacking: आईफोन को लेकर हमेशा यही धारणा रही कि ये हैक नहीं हो सकता. एपल भी ये दावा करता है कि आईफोन काफी सुरक्षित स्मार्टफोन है. एंड्रॉयड के मुकाबले इसे काफी सेफ माना जाता है. आईफोन को लेकर क्या ये धारणा वाकई सच है? इस आर्टिकल में हम ये देखेंगे कि आईफोन को हैक किया जा सकता है या नहीं.
2 / 6
iPhone Hacking: सेफ्टी आणि फीचर्सच्या बाबतीत iPhone ला अतिशय सुरक्षित स्मार्टफोन मानले जाते. पण, सायबर हॅकर्स सातत्याने फोन हॅक करण्याचे नव-नवीन मार्ग शोधत असतात. अशा परिस्थितीत iPhone हॅक होऊ शकतो का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. iPhone हॅक करता येतो, तर तो कसा? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
3 / 6
तुम्ही आयफोन वापरत असाल, तर या फोनच्या सुरक्षेबाबत तुम्हालाही काळजी वाटत असेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आयफोनदेखील हॅक केला जाऊ शकतो. अँड्रॉइड स्मार्टफोनप्रमाणेच हॅकर्स आयफोनही हॅक करू शकतात. आयफोन 13 प्रो अवघ्या 1 सेकंदात हॅक झाल्याचेही एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
4 / 6
गेल्या वर्षी चीनमध्ये Tianfa कप आंतरराष्ट्रीय नेटवर्क सुरक्षा स्पर्धेदरम्यान एका हॅकरने iPhone 13 Pro हॅक करुन दाखवला होता. पंगू लॅब्सच्या हॅकरने अवघ्या 1 सेकंदात हा फोन हॅक केला होता. हॅकिंगसाठी युजरला फक्त एका लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर हॅकरला iPhone 13 Pro चा अॅक्सेस मिळाला.
5 / 6
जर्मनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ डार्मस्टॅडच्या संशोधकांना असे आढळून आले आहे की, आयफोन बंद असतानाही तो हॅक केला जाऊ शकतो. त्यांच्या अभ्यासानुसार, आयफोन 12 असो, आयफोन 13 किंवा इतर कोणताही आयफोन असो, तो मालवेअरद्वारे हॅक केला जाऊ शकतो. आयफोन बंद असेल, तरीही हॅकिंग होतच राहते. याचे कारण म्हणजे, आयफोनचे काही फीचर्स स्विच ऑफ केल्यानंतरही अॅक्टिव्ह असतात.
6 / 6
आयफोनमधील ब्लूटूथ, नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) आणि अल्ट्रा-वाइडबँड (UWB) पॉवर बंद झाल्यानंतरही काम करत राहतात. हे फीचर्स आयफोन शोधण्यासाठी(Find my device) वापरली जातात. हॅकर्स या तिन्ही फीचर्सद्वारे तुमच्या आयफोनमध्ये घुसू शकतात. ब्लूटूथ चिपचे फर्मवेअर बदलून किंवा मालवेअर लोड करून आयफोन हॅक केला जाऊ शकतो. Apple च्या नवीन iPhone 15 सीरिजबाबत अशाप्रकारची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचtechnologyतंत्रज्ञान