मनगटावर बांधता येणारा नुबिया अल्फा स्मार्टफोन लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:49 IST2019-04-09T20:44:38+5:302019-04-09T20:49:23+5:30

चिनी टेक कंपनी नुबियाने मनगटावर बांधता येणारा स्मार्टफोन लाँच केला आहे.
हा स्मार्टफोन वेअरेबल अल्फा या नावाने चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
बार्सिलोना मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019मध्ये हा फोन कंपनीने प्रथम सादर केला होता.
हाताच्या मनगटावर बांधता येणाऱ्या फोनमधील स्क्रीन हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे.
चीनमध्ये एका खास इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला गेला. या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत 3499 युआन म्हणजे 36 हजार रुपये आहे.