जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय; अवघे जगणेच बदलून टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 11:15 IST2019-04-18T11:12:28+5:302019-04-18T11:15:00+5:30

वैज्ञानिकांनी अखेरीस जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय बनविण्यात यश मिळविले आहे. हे हृदय आकाराने छोटे ्सले तरीही ते पूर्णपणे मानवाच्या हृदयाप्रमाणेच बनविण्यात आले असून त्याचप्रमाणे कामही करते.
इस्त्रायलच्या तेल अवीव विद्यापीठीच्या संशोधकांनी हे हृदय बनविले आहे. प्रोफेसर ताल दवीर यांनी सांगितले की एका रुग्णाचे बायोलॉजिकल मटेरियल एकत्र करून हे हृदय बनविले आहे. यामध्ये चरबी, पेशींचा वापर करण्यात आला आहे. ज्या पूर्णपणे मानवी हृदयासारखे काम करतात.
सशाच्या हृदयाच्या आकाराएवढे हृदय
या थ्रीडी प्रिंटेड हृदयाचा आकार एका सशाच्या हृदया एवढा आहे. मात्र, मानवी हृदयासारखे कप्पे, रक्तवाहिन्या बनविण्यात आल्या आहेत. रुग्णाच्या पेशींपासून बनविण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी शरीर या हृदयाला प्रतिसाद देईल.
अवयव दात्याची वाट पहावी लागणार नाही
या शोधामुळे अवयव दात्याची बराच काळ वाट पाहावी लागणार नाही.
या हृदयामध्ये सेल्स टाकल्यावर ते त्वरित रक्त ढकलण्यास सुरुवात करते. भविष्यात यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचतील.