श्रीमंत लोक फोनला 'कव्हर' का लावत नाहीत? यामागील कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:52 IST2025-12-16T15:47:39+5:302025-12-16T15:52:46+5:30

आपल्यासारखा सामान्य माणूस फोन घेताच आधी कव्हर शोधतो, पण अब्जाधीशांची विचारसरणी वेगळी; केवळ श्रीमंतीच नाही तर तांत्रिक कारणेही आहेत महत्त्वाची.

आपल्यासारखा सामान्य माणूस फोन घेताच आधी कव्हर शोधतो, कारण अनेकांसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हा मोठा खर्च असतो. यामुळे तुटण्या, फुटण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला बॅक कव्हर देखील खरेदी केले जाते. आता तर अनेक कंपन्यांना बॉक्समध्येच कव्हर देत आहेत. परंतू, तुम्हाला माहिती आहे का, जे श्रीमंत लोक असतात ते कधीच त्यांच्या स्मार्टफोनना कव्हर घालत नाहीत.

आपल्यासाठी फोनचा खर्च हा महागडा असतो, परंतू त्यांच्यासाठी तर किती महत्वाचा असतो. कारण एवढ्या कोटींचा टर्नओव्हर, क्लायंटसोबतच्या मिटींग, चर्चा आदी सगळे त्यातच असते. तरीही हे लोक त्यांच्या फोनना कव्हर घालत नाहीत. तुम्ही कधी एलन मस्क, जेफ बेजोस किंवा मार्क जकरबर्ग यांचे फोटो पाहिले आहेत का? त्यांच्या हातात आयफोन किंवा सॅमसंगचे महागडे मॉडेल्स असतात, पण त्यावर कधीही कव्हर नसते. अब्जाधीश लोक आपल्या फोनला उघडे का ठेवतात, याची काही रंजक कारणे समोर आली आहेत.

तांत्रिकदृष्ट्या, स्मार्टफोनमध्ये बॅक कव्हर लावल्यामुळे फोनची उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. कव्हर नसल्यास फोन नैसर्गिकरित्या थंड राहतो. जेव्हा फोन थंड असतो, तेव्हा त्याचा प्रोसेसर अधिक वेगाने काम करतो आणि ॲप्स हँग होत नाहीत. मस्क सारख्या 'टेक-सॅव्ही' लोकांसाठी फोनचा वेग हा सर्वात महत्त्वाचा असतो.

अनेकांना हे ठाऊक नसेल, पण काही जाड कव्हर्समुळे फोनमधील 'अँटेना बँड्स' ब्लॉक होतात. यामुळे विशेषतः ५जी नेटवर्क पकडताना अडचण येते. अखंड कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून हे दिग्गज कव्हर टाळतात.

ऍपल किंवा सॅमसंग सारख्या कंपन्या फोन स्लिम आणि दिसायला प्रीमियम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. कव्हर लावल्यामुळे हा मूळ लुक लपला जातो आणि फोन जाड वाटू लागतो. अब्जाधीशांना फोनचे मूळ स्लीक डिझाइन अनुभवायला आवडते.

हा विषयच नाही सर्वात उघड कारण म्हणजे आर्थिक सुबत्ता. सामान्य माणसाला फोन पडला आणि स्क्रीन फुटली तर हजारो रुपयांचा फटका बसतो. मात्र, अब्जाधीशांसाठी फोन फुटणे ही किरकोळ बाब आहे. ते क्षणार्धात नवीन फोन खरेदी करू शकतात किंवा त्यांच्याकडे फोन दुरुस्तीसाठी स्वतंत्र टीम उपलब्ध असते.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मते, फोनला कव्हर न लावणे हे एक प्रकारचे 'लक्झरी स्टेटमेंट' आहे. हे दर्शवते की तुम्ही तुमच्या महागड्या वस्तूंच्या बाबतीत किती निश्चिंत आहात.