WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:23 PM2022-01-21T16:23:54+5:302022-01-21T16:34:16+5:30

WhatsApp भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. यावर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स बनवले जातात. या ग्रुप्समध्ये एक अ‍ॅडमिन असतो, जो या ग्रुपची निर्मिती करतो आणि सांभाळतो. परंतु या अ‍ॅडमिनला काही चुका महागात पडू शकतात. त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत.

अ‍ॅडमिन ग्रुपमध्ये मेम्बर्स अ‍ॅड करणं त्यांना काढून टाकणं ही कामं करतो. तसेच ग्रुपच्या अनेक सेटिंग्स बदलण्याचा हक्क देखील ग्रुप अ‍ॅडमिनकडे असतो. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपची माहिती असणे आवश्यक आहे. ग्रुपमध्ये कोणता कंटेंट ग्रुप मध्ये शेयर केला जात आहे यावर लक्ष असणं आवश्यक आहे. पुढे आपण 5 चुका पाहणार आहोत ज्या अ‍ॅडमिनला जेल वारी होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर परवानगी शिवाय कोणाचेही खाजगी फोटो किंवा व्हिडीओ व्हिडीओ शेयर करू नका. हा एक गुन्हा आहे आणि यावर कारवाई केली जाऊ शकते. मग ती व्यक्ती अ‍ॅडमिन असो किंवा नसो.

ग्रुपवर धर्मचा अपमान करणारे व्हिडीओ, इमेजेस किंवा मेसेजेस पोस्ट करू नकार. त्यामुळे हिंसाचार सुरु होऊ शकतो आणि पोलीस तुम्हाला अटक करू शकतात.

ग्रुपमध्ये अश्लील कंटेंट शेयर करणे देखील गुन्हा आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि देहविक्री संबंधित मेसेजेस शेयर करणे अपराध आहे आणि असे केल्यास युजरला जेलची हवा खावी लागू शकते.

खोट्या बातम्या पसरवणे देखील गुन्हा आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर तथ्य पडताळून पाहण्याचं साधन नसल्यामुळे अनेक छोट्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवला जातो. त्यामुळे एका फेक न्यूजचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यासंबधीत कायदांतर्गत फेक न्यूज पसरवणाऱ्याच्या विरोधात तक्रार केली जाऊ शकते.

कोणत्याही ग्रुपमध्ये देशविरोधी कंटेंट शेयर होऊ देऊ नये, याची जबाबदारी अ‍ॅडमिनची आहे. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला अटक होऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका ग्रुप अ‍ॅडमिनला अटक करण्यात आली होती.