डेस्कटॉप युजर्ससाठी WhatsApp नं जारी केलं फेस आणि फिंगरप्रिंट अनलॉक, असं काम करेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 05:24 PM2021-01-28T17:24:57+5:302021-01-28T17:43:00+5:30

WhatsAppने व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉपसाठी अॅडिशनल सिक्योरिटी फीचर्सची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ज्यावेळी युजर्स आपले अकाऊंट कॅम्प्युटरला लिंक करतील, त्यावेळी त्यांना अॅडिशनल सिक्योरिटी मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला आता अकाऊंट वेब किंवा डेस्कटॉपवर लिंक करण्याआधी व्हेरिफाय करावे लागेल. हे नवीन फीचर लवकरच जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे अँड्रॉइड युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा डेस्कटॉपच्या व्हेरिफिकेशनसाठी आपला फेस किंवा फिंगरप्रिंट अनलॉक वापरू शकतील. तर दुसरीकडे, आयफोन युजर्सला आपले अकाऊंट फेस आयडीद्वारे व्हेरिफाय करावे लागेल.

ज्यावेळी युजर्स आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कोणत्याही लॅपटॉप किंवा पीसीला कनेक्ट करतील, त्यावेळी हे सिक्योरिटी व्हेरिफिकेशन समोर येईल. तसेच, ही प्रोसेस फोनवरून क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी दिसून येईल.

कंपनीने म्हटले आहे की, या नवीन फीचरशिवाय आपल्या माहितीच्या हाऊसमेट किंवा ऑफिसमेटद्वारे आपल्या अकाऊंटला कोणत्याही दुसऱ्या डिव्हाईसमध्ये लिंक केल्याची शक्यता राहणार नाही.

व्हॉट्सअॅपने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपल्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमद्वारे स्टोअर केलेल्या बायोमेट्रिक इंफॉर्मेशनला अॅक्सेस करू शकत नाही. नवीन सिक्योरिटी फीचर फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या व्हिज्युअल रीडिझाइनसह लाँच करण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप सध्या आपल्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, याच दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवीन भन्नाट फीचर आणणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते.

असेच एक जबरदस्त फीचर लवकरच येणार असून यामुळे चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टीकर शॉर्टकट (Sticker Shortcut) नावाचे एक फीचर येणार आहे.

WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपमधील स्टीकर शॉर्टकट फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर लवकरच ग्लोबल युजर्ससाठी रोलआऊट केले जाऊ शकते. चॅट बारमध्ये हे फीचर पाहायला मिळू शकते.